देणगी आवाहन
शिक्षण, सुविधा व सामाजिक बांधिलकीसाठी आपले योगदान
श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर ही गेल्या अनेक दशकांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार व सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या विविध शैक्षणिक व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दानशूर व्यक्ती, पालक व समाजबांधवांकडून देणगीचे आवाहन करण्यात येत आहे.
शाळा इमारत व वर्गखोल्या
संस्थेच्या शाळांच्या नवीन इमारती व वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच जुन्या इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी देणगी स्वीकारली जाते.
स्वच्छतागृह बांधकाम
ग्रामीण शाखांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित व स्वच्छ स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी देणगीची आवश्यकता आहे.
बेंचेस व शालेय फर्निचर
ग्रामीण शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नवीन बेंचेस, टेबल्स व आवश्यक फर्निचर खरेदीसाठी योगदान दिले जाऊ शकते.
सभागृह नूतनीकरण
स. भु. प्रशाला, छत्रपती संभाजीनगर येथील जालान सभागृहाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्यासाठी देणगी स्वीकारली जाते.
‘मायेची सावली’ उपक्रम
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, कंपास, पेन, पेन्सिल, गणवेश, सॉक्स, बूट, जेवणाचा डबा व वॉटर बॅग मोफत दिली जातात.
सायकल वाटप
ग्रामीण भागातील मुलींना शाळेत येणे सुलभ व्हावे यासाठी ‘मायेची सावली’ उपक्रमांतर्गत सायकलींचे वाटप केले जाते.
प्रयोगशाळा विकास
संस्थेअंतर्गत गणित, विज्ञान, रोबोटिक्स व भाषा प्रयोगशाळांच्या उभारणी व सुसज्जतेसाठी देणगीचे स्वागत आहे.




